मालवणात यामाहा कंपनीच्या आउट बोर्ड इंजिनच्या फ्री सर्व्हिसिंग कॅम्पला मच्छीमारांचा प्रतिसाद
मच्छीमार नौकांसाठी वापरण्यात येणाऱ्या आउट बोर्ड इंजिनचे कंपनीच्या वतीने फ्री सर्व्हिसिंग
दांडी येथे आयोजित दोन दिवसीय कॅम्पचा शुभारंभ ; सवलतीच्या दरात नवीन यामाहा इंजिनही मच्छीमाराना उपलब्ध
मालवण | कुणाल मांजरेकर : यामाहा कंपनीच्या वतीने मालवणातील मच्छीमार नौकांच्या यामाहा आऊट बोर्ड इंजिनचे फ्री सर्व्हिसिंग करण्याच्या दोन दिवसीय विशेष उपक्रमाचा शुभारंभ मालवण दांडी मोरेश्वरवाडी मोरयाचा धोंडा देवस्थान किनारपट्टीवरील धुरी कंपाऊंड येथे गुरुवारी करण्यात आला. या कॅम्पला मालवण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
यामाहा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगापूर येथील मुख्य मॅकेनिक व चेन्नई येथील मॅकेनिक टीम यांच्या वतीने मच्छीमार नौकांच्या आऊट बोर्ड इंजिनचे फ्री सर्व्हिसिंग करण्यात आले. यात दोन प्लग, वॉशर, गिअर ऑइल बदलणे मशीन सर्व्हिसिंग, यासह कंपनीचे टीशर्ट मशीन मालकांना देण्यात आले.
यामाहा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर मेजो सर, कंपनीचे जागतिक प्रतिनिधी जॅकी, माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर, मच्छीमार नेते बाबी जोगी यांच्या उपस्थितीत मोफत सर्व्हिसिंग कॅम्पचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कंपनीचे सर्व्हिस हेड प्रवीण कुमार, राकी मालन, जॉय, क्रमेश, शाजु यासह मॅकेनिक रजित, आजेश, चंडी यासह अन्य कंपनी प्रतिनिधी तसेच मच्छीमार बांधव यांसह मंदार केणी, संमेश परब, दीपक देसाई, प्रसाद आडवणकर, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.
माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी कंपनीच्या फ्री सर्व्हिसिंग कॅम्प आयोजनाचे कौतुक केले. तसेच हा कॅम्प मालवण किनारपट्टीवर दांडी भागात सर्वप्रथम व्हावा यासाठी पुढाकार घेणारे मच्छीमार नेते बाबी जोगी यांचेही खोबरेकर यांनी कौतुक केले.
कॅम्पमध्ये सवलतीच्या दरात यामाहा इंजिन मच्छीमाराना उपल्बध करण्यात आले आहे. याचाही लाभ मच्छीमार घेत आहेत. रुपये पाच हजार सवलत असलेल्या पहिल्या इंजिनची विक्रीही कॅम्पमध्ये झाली. अन्य काही सवलत ही मच्छीमार बांधवांसाठी आहेत. तरी या कॅम्पचा लाभ मच्छीमारानी घ्यावा असे आवाहन मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी केले आहे.