शिंदे गटाचे बळ वाढताच मालवणात तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती !

“या” पदाधिकाऱ्याकडे दिली मालवणची जबाबदारी

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मालवणात शिंदे गटाचे बळ वाढले आहे. त्यामुळे शिंदे गटाने मालवण तालुकाप्रमुख पदाची नियुक्ती केली आहे. गुरुवारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या राजा गावकर यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. गावकर यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली.

राजा गावकर, तालुकाप्रमुख

राजा गावकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. दीपक केसरकर यांच्या सोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!