मालवणात विनापरवाना वॉटरस्पोर्ट्सवर बंदर विभागाची कारवाई

मालवण : सागरी पर्यटन हंगामास १ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे. मालवण किनारपट्टीवर पर्यटकही दाखल होत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला वॉटर स्पोर्ट्स व्यवसायही सुरू झाला आहे. दरम्यान, विनापरवाना वॉटर स्पोर्ट्स वर मालवण बंदर विभागाने बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्या मार्गशनाखाली धडक कारवाई सुरू केली आहे.

रविवारी मालवण किनारपट्टीवर बंदर जेटी व दांडी येथे कारवाई करण्यात आली. यात एका व्यावसायिकाची एक विनापरवाना जेटस्की व दोन व्यावसायिकांवर प्रत्येकी १० हजार दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाई पथकात कर्मचारी कदम व तोरसकर हे सहभागी होते. सर्वांनी नियमांचे पालन करावे. पर्यटकांची पर्यटन सफर सुरक्षित व्हावी. याला सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. त्या दृष्टीने तपासणी व प्रसंगी कारवाई मोहीम सुरू असल्याचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!