“त्या” व्हिडिओ पासून प्रेरणा ; आडारी गणपती मंदिर परिसराचे झाले सुशोभीकरण

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मानले आमदार, खासदारांचे आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील आडारी गणपती मंदिर परिसराचे पालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे. एका व्हिडिओ पासून प्रेरणा घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रयत्नातून हा परिसर सुशोभित करण्यात आला असून यासाठी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याबद्दल श्री. कांदळगावकर यांनी आमदार, खासदारांसह स्विमिंग प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचे आभार मानले आहेत.

मालवण गवंडीवाडा येथील स्विमिंग प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांनी एक व्हिडिओ पाठवून अशा प्रकारचे सुशोभीकरण मालवण मध्ये कुठे करता येतील का पाहावे, अशी सूचना महेश कांदळगावकर यांना केली होती. आडारी गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण ही संकल्पना मनामध्ये होती आणि हा व्हिडिओ बघितल्यावर अश्या प्रकारे सुशोभीकरण आडारी या ठिकाणी करण्याबाबतची कल्पना श्री. कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राउत यांच्याकडे बोलून दाखवली. त्यांनी तात्काळ या बाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केली. आणि या कामासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून २५ लाख एवढा निधी मंजूर करून दिला. हे काम आज पूर्णत्वास होत आहे. मध्यंतरी कोविडच्या संकटामुळे या कामाला थोडा वेळ लागला, पण आज काम पूर्ण झाल्याचा आनंद आहे. हे ठिकाण धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, या परिसराचे सुशोभीकरण झाल्याने या ठिकाणी पर्यटक वाढतीलच, पण मालवणवासीयां साठीही एक विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण झाले आहे. त्यामूळे या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीची संधी प्राप्त झाली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांचे मालवनवासीयांतर्फे आभार मानत असल्याचे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!