गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर असरोंडी ते कणकवली रस्ता झाला खड्डेमुक्त !

माजी सभापती सुनील घाडीगावकर, असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांची तत्परता

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी सण तोंडावर येऊन ठेपला असून जागोजागी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमानी आणि गणेश भक्तांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन भाजप नेते, माजी सभापती सुनील घाडीगांवकर आणि असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकारातून असरोंडी मुख्य रस्ता ते कसरल सातरल कणकवली मार्ग खड्डेमुक्त झाला आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गावात येणाऱ्या चाकरमानी, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुनील घाडीगावकर व मकरंद राणे यांच्या प्रयत्नातून या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले. यावेळी बूथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत, रघुनाथ सावंत, बेटा गावडे, प्रदीप सावंत, राघू गावकर, सूनिल असरोंडकर यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!