सुकळवाड मधील एमआयटीएम कॉलेजमध्ये दहीहंडी उत्साहात

ओरोस : मेट्रोपिलियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालय सुकळवाड ओरोस रेल्वे स्टेशन नजीक या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थी, प्राचार्य आणि अन्य शिक्षक वर्ग यांनीही या दहीहंडीचा आनंद लुटला. यावेळी शिक्षकांमधून प्रा. विशाल कुशे यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. तर विद्यार्थ्यांनी तीन थरांची दहीहंडी रचून फोडली. यामध्ये सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग घेतला. या कार्यक्रमाकरीता एमआयटीएमचे प्राचार्य सूर्यकांत नवले, डीन अकॅडमी पुनम कदम, राकेश पाल यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!