गवंडीवाड्यातील “त्या” विद्युत वाहिन्यांनी घेतला मोकळा श्वास ; अमेय देसाईंचा पाठपुरावा
वाहिन्यांवर वाढलेल्या झाडी झुडपे, वेलींमुळे निर्माण झाला होता धोका
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील गवंडीवाड्यातील विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे आणि वेली वाढल्याने या वाहिन्या धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी ह्या विद्युत वाहिन्या मोकळ्या करण्यासाठी महावितरणकडे पाठपुरावा केल्यानंतर ह्या वीज वाहिन्यांवरील झाडी तोडण्यात आली. याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गवंडीवाडा येथील दोन ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर वेली चढल्याने ह्या वाहिन्या धोकादायक बनल्या होत्या. वाढलेल्या झाडी झुडपामुळे ह्या विद्युत वाहिन्या तुटून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ह्या वीज वाहिन्या स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत होती. त्यामुळे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी महावितरण कडे पाठपुरावा केल्या नंतर ह्या विद्युत वाहिन्या साफ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.