भाजपच्यावतीने वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघात वह्या वाटप
मंदार लुडबे यांच्या माध्यमातून विभागातील सर्व गावातील शालेय विद्यार्थ्यांना लाभ
मालवण : भाजपा नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि संदेश ऊर्फ गोटया सावंत यांच्यावतीने मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघात शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंदार लुडबे यांनी पुढाकार घेतला. जि.प. मतदार संघातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना या मोफत वह्यांचा लाभ मिळाला.
यावेळी शक्ती केंद्रप्रमुख रामा चोपडेकर, भाई मांजरेकर, ग्रा. पं. सदस्या सौ. धुरी मॅडम, दत्ता चोपडेकर, सहदेव साळगांवकर, संकेत राऊळ, जॅक्सन लुद्रीक, गणेश मोंडकर व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.