मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदिर सभामंडपासाठी १५ लाख मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी ; पोईप येरमवाडी रस्त्यासाठीही ५ लाख रुपये मंजूर ; आ. नाईक यांच्याहस्ते दोन्ही कामांचे भूमिपूजन

मालवण : मालवण तालुक्यातील मसदे येथील श्री देव स्वयंभू गणेश मंदीर परिसरात सभामंडप उभारण्याच्या स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या मागणीची आ.वैभव नाईक यांनी तात्काळ दखल घेऊन १५ लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. त्याचबरोबर पोईप येरमवाडीमधील पोईप धरण तट ते अशोक पालव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीची पूर्तता करत या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे. या दोन्ही कामांचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. 

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना हक्काचा आमदार म्हणून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. येत्या काळात मतदारसंघातील इतर अनेक रस्त्यांची व विकासात्मक कामे देखील पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानत निधी मंजुरीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी मसदे उपशाखाप्रमुखपदी किरण गावडे यांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देत निवड करण्यात आली. 

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, मालवण युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, विभागप्रमुख विजय पालव, सुरेश नेरुरकर, रुपेश वर्दम, अनंत पाटकर, बाबली पालव, युवासेना विभागप्रमुख अक्षय नेरुरकर, गणेश नेरुरकर, शाखाप्रमुख बाळा सांडव, अनिल येरम, राजु आंगणे, राजु येरम, बबन आंगणे, मसदे गावातील दिपक मसदेकर, अवि प्रभु, किरण गावडे, अजित प्रभु, वामन देऊलकर, गणेश देऊलकर, संतोष मसदेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!