धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू

भुईबावडा घाटातील घटना

वैभववाडी : भुईबावडा घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण (वय २९ या. कापडपेठ, मिरज जि. सांगली) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सांगली येथील काही पर्यटक वर्षा सहलीसाठी भुईबावडा घाटात आले होते. भुईबावडा घाटात वाहणाऱ्या धबधब्यामध्ये ते आंघोळीसाठी उतरले होते. आंघोळ करत असताना यातील एक पर्यटक मोरीतून वाहत जात खाली दरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, अभिजीत तावडे, विलास राठोड, श्री पडीलकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. गगनबावडा येथील काही ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत त्यांनी घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!