कणकवलीत राडा ! शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

कणकवली : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना कोणाची, यावरून संघटनेत उभी फूट पडली असताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये कणकवली नरडवेनाका येथे मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली. येथीलच वैभव बारच्या समोर शिवसेनेच्या ठाकरे गटातील दोन पदाधिकारी आणि शिंदे गटातील उदय सामंत यांना भेटण्यास गेलेले पदाधिकारी एका दुसऱ्यासमोर आले. यावेळी शाब्दिक वाद झाला, त्यानंतर शिंदे गटातील तीन जणांनी मिळून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केली.

कणकवली तालुक्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट नुकतेच होऊ लागले आहेत. त्यातील उदय सामंत यांना भेटण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात काही पदाधिकारी गेले होते. हे पदाधिकारी आज शिवसेना शाखेच्या बाहेरील बाजूस वैभव बियरबार नजीक ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या समोरासमोर आले. यावेळी शाब्दिक टोमणेबाजी झाली. सामंत यांना भेटण्यास गेल्या मुळे काही आक्षेपार्ह बोलल्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना राग आला त्यांनी आक्रमक होत थेट ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याला मारहाण केली. अद्याप पोलिसात याबाबत कोणाचीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!