असरोंडी गावातील ३ प्राथमिक शाळांमध्ये भाजपच्या वतीने वह्या वाटप

उपसरपंच मकरंद राणे यांचा पुढाकार

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावात भाजपच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यासाठी उपसरपंच मकरंद राणे यांनी पाठपुरावा केला. गावातील ३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.

प्राथमिक शाळा नं. १ याठिकाणी उपसरपंच मकरंद राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, आरती आजगावकर, मुख्याध्यापक चिंदरकर मॅडम, चौथरे मॅडम उपस्थित होत्या. शाळा नं. २ मध्ये उपसरपंच मकरंद राणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, स्नेहा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संदीप परब, भाई गावकर, सुनील असरोंडकर, रघुनाथ सावंत, मुख्याध्यापक राणे सर, मुंडे सर उपस्थित होते. तर शाळा नं. ३ मध्ये सरपंच स्नेहल सावंत, उपसरपंच मकरंद राणे, ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चव्हाण, मुख्याध्यापक हर्णे मॅडम, अंगणवाडी सेविका सावंत मॅडम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!