घुमडे येथे १३ ते १६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा

श्रावण मासचे औचित्य साधून दत्ता सामंत यांच्या वतीने आयोजन

मालवण : तालुक्यातील घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिरात श्रावण मास निमित्ताने उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वतीने जिल्हास्तरीय निमंत्रित बुवांची भजन स्पर्धा १३ ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

हरी नामाची सेवा घडून भजन रसिकांना हरिनामाचा गोड आस्वाद मिळावा याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या मंडळास अनुक्रमे ११,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, ७,७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, ५,५५५ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, उत्तेजनार्थ प्रथम ३,३३३ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, द्वितीय २,२२२ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, तृतीय १,१११ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट गायक १,१११ रुपये, मृदुंगमणी १,१११ रुपये, झांज वादक १,१११ रुपये, कोरस १,१११ रुपये, याशिवाय प्रथम एक ते सहा विजेत्यांमध्ये जे संघ येणार नाहीत. त्यामधून भजन संघांना कै. भूषण देसाई पाट यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट गायक १,१११ रुपये, प्रशस्तीपत्रक, सर्वोत्कृष्ट मृदंगमणी १,१११ रुपये, प्रशस्तीपत्रक, सर्वोत्कृष्ट झांजवादक १,१११ रुपये, प्रशस्तीपत्र, सर्वोत्कृष्ट कोरस १,१११ रुपये, प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भजन मंडळांनी ३० जुलै पर्यंत प्रवेश शुल्क ५०० रुपये सह भाऊ सामंत ९४२३८०६२९८, बाळा माने ७५०७५२०१००, योगेश सामंत ९०४९४८८७३२ यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!