माजी खासदार निलेश राणे उद्या कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर

नेरूर, वालावल, कवठी जि. प. विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व विकास कामांवर चर्चा

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे रविवारी १० जुलै रोजी कुडाळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नेरूर, वालावल, कवठी जि. प. विभागात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असून विकास कामांवर चर्चा करणार आहेत.

रविवारी सकाळी १०.३० वाजता आषाढी एकादशी निमित्त कोकणातील प्रति-पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालावल येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदीरामध्ये दर्शन व लक्ष्मी नारायणाच्या चरणी पुजा, सकाळी ११.३० वाजता कवठी ग्रामस्थांची भेट व चर्चा, दुपारी १२.३० वाजता हुमरमळा, दुपारी २ वाजता नेरूर येथे कै. सुधिर कलिंगण यांच्या घरी भेट, दुपारी २.३० वाजता भाई कलिंगण यांच्या घरी भेट व ग्रामस्थांशी चर्चा असा त्यांचा दौरा नियोजित आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व विकासकामांवर ते स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!