सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात मोफत केक बनवण्याचे प्रशिक्षण
भाजपा मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन
मालवण : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण व जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने सोमवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे महिलांसाठी मोफत केक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये विविध प्रकारचे केक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यामध्ये केकचा बेस व आयसिंग करण्यात शिकवणार आहेत. ज्या महिलांना या प्रशिक्षणात सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी महिला शहर अध्यक्ष सौ. चारुशीला आचरेकर मो.९४०४३४४३२२, सौ. ममता वराडकर मो. ८२०८४५४९७५, सौ. पुजा करलकर मो.७७४४९७२१११, सौ पूजा सरकारे, सौ. महानंदा खानोलकर, सौ ममता वेर्लेकर, सौ. दिव्या कोचरेकर, सौ. गावकर तसेच भाजपा शहर कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र जन शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे तर्फे देण्यात येणार आहे.