ही शान कोणाची… कोकणच्या “राजाची…!”

रात्रीचे ११.३० उलटूनही राणेंच्या स्वागतासाठी कणकवलीच्या रस्त्यावर हजारोंचा जनसागर

कुणाल मांजरेकर

    नारायण राणेंना कोकणचा राजा का म्हणतात ? याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री कणकवलीच्या रस्त्यावर दिसून आला. नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सध्या सिंधुदुर्गात सुरू आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता ही यात्रा कणकवली शहरात दाखल होणार होती. मात्र ठिकठिकाणचे स्वागत स्वीकारताना ही यात्रा कणकवलीत पोहोचायला तब्बल रात्रीचे साडे अकरा वाजले तरीही हजारोंचा जन समुदाय राणेंची वाट पाहत कणकवलीच्या रस्त्यावर उपस्थित होता. त्यामुळे "न भूतो न भविष्यति" अशा स्वरूपात कोकणच्या या लाडक्या राजाचे कणकवली मध्ये स्वागत झाले. आमदार नितेश राणेंचे चोख नियोजन याचा प्रत्यय यावेळी दिसून आला. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे स्वागत करण्यात आले.


कणकवली हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कणकवलीत शहरात शुक्रवारी रात्री जन आशीर्वाद यात्रेचे लक्षवेधी स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुगर्जना ढोल पथकाचा लक्षवेधी अविष्कार ठरला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, गोट्या सावंत, अतुल काळसेकर, संध्या तेरसे, सुरेश सावंत, मिलींद मेस्त्री, संदिप मेस्त्री, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. कणकवलीत ना. राणे येणार असल्याने सायंकाळी ८ वाजल्यापासून पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने गर्दी, त्यात ढोल पथकाची साथ यामध्ये कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता. भारतीय जनता पक्षाचे झेंडे डोलाने फिरवत कार्यकर्ते अमाप उत्साह साजरा करत होते.

हा उत्साह रात्री उशिरापर्यंत तसाच होता. अखेर केंद्रीय मंत्री राणेंचे आगमन झाल्यानंतर त्यांचे अपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!