रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदी रतन पांगे यांची निवड

सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर ; ९ जुलै रोजी पदग्रहण

कुणाल मांजरेकर

मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारणी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी रतन पांगे, सचिवपदी अभय कदम तर खजिनदारपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ शनिवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल जानकी मध्ये होणार आहे. नवीन वर्षात रोटरीच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष रतन पांगे यांनी दिली.

येथील हॉटेल स्वामी मध्ये मंगळवारी सायंकाळी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष उमेश सांगोडकर, महादेव पाटकर, ऋषी पेणकर, संजय गावडे, राजन तांबे, संदेश पवार, महेश काळसेकर, राजेश पारधी आदी रोटरीयन उपस्थित होते. नूतन संचालक मंडळात उमेश सांगोडकर, अभय कवटकर, डॉ. लीना लिमये, प्रा. अनिल देसाई, प्रदीप जोशी, महादेव पाटकर, डॉ. अजित लिमये, सुहास ओरसकर, प्रसन्नकुमार मयेकर, महेश काळसेकर, संजय पेंडूरकर, मेघनाद धुरी, विठ्ठल साळगावकर, प्रा. सुमेधा तिनईकर, डॉ. अच्युत सोमवंशी, संदेश पवार यांचा समावेश आहे.

रोटरी क्लबच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पदग्रहण सोहळ्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित रोटरी क्लबचे पदाधिकारी

सन २०२२-२३ च्या नूतन वर्षात सिंधुदुर्ग महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच पर्यटकांसाठी सूचना फलक, स्वच्छता मोहीम, ब्लड डोनेशन कॅम्प, समरगीत, वक्तृत्व स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, अंध बांधवांचा स्नेहमेळावा, पर्सनलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, पोलिओ जनजागृती, गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुजनांचा सत्कार, लाईव्ह पाककला स्पर्धा, शालेय मुलांना साहित्य वितरण, किशोरवयीन मुलींना लैंगिक विषयावर मार्गदर्शन, फातिमा कॉन्व्हेंट मध्ये दिवाळी, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरे, शाळा आणि ग्रंथालयांना ४०० पुस्तकांचे वाटप, जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा किंवा बुद्धिबळ स्पर्धा, रोटरी मॅरेथॉन, हॅप्पी स्कुल, व्यापाऱ्यांसाठी कर मार्गदर्शन शिबीर, पर्यटन व्यावसायिक मार्गदर्शन, पाणी अडवा- पाणी जिरवा उपक्रम, टाकाऊ कचऱ्या पासून वस्तू बनवणे, कागदी पिशव्या वाटप असे विविधांगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!