अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट

कुणाल मांजरेकर

मालवण: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर, मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.

महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी हॉटेल मँगो येथे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी यांची त्यांनी संवाद बैठक घेतली. तर बुधवारी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज हॉल येथे कुडाळ-मालवण आणि दुपारी ०२.३० वाजता कणकवली-वैभववाडी-देवगड तालुका येथील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची संवाद बैठक होणार आहे. बुधवारी सायंकाळी अमित ठाकरे मालवण येथे येणार असुन त्यांच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3606

Leave a Reply

error: Content is protected !!