असरोंडी हायस्कूलमध्ये रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

उपसरपंच मकरंद राणे यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू

कुणाल मांजरेकर

मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीमध्ये मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यास उपस्थित माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा सत्कार करताना उपसरपंच मकरंद राणे सोबत अन्य

या कार्यक्रमास जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम समिती सभापती महेंद्र चव्हाण, उपसरपंच मकरंद राणे, संस्था सचिव प्रकाश सावंत, संचालिका सौ. सुमन सावंत, संस्था सहसचिव प्रदिप सावंत, मुख्याध्यापक सुशांत पाटील, बुथ कमिटी अध्यक्ष संजय सावंत, रघुनाथ सावंत, संजय घाडीगावकर यांच्यासह पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ आणि हितचिंतक उपस्थित होते. यावेळी प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त विशाल मंगेश जंगले, द्वितीय क्रमांक प्राप्त श्रेया अभिमन्यू सावंत, तृतीय क्रमांक प्राप्त विनीता विलास जंगले यांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक भगिरथ चिंदरकर यांनी केले व आभार मिलींद गावकर सर यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!