सिंधुदुर्गात कोरोनाचा धोका वाढतोय ; आज तब्बल २३ पॉझिटिव्ह
दोडामार्ग मध्ये आज सर्वाधिक ८ रुग्ण तर मालवणात ४ रुग्ण आढळले ; ४३ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढू लागला असून शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३ कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५५ हजार ८९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
शनिवारी दोडामार्ग मध्ये सर्वाधिक ८ रुग्ण मिळून आले आहेत. तर देवगड मध्ये ३, कणकवली ३, कुडाळ १, मालवण ४, सावंतवाडी ४ असे २३ रुग्ण मिळून आले आहेत.