पर्यटकांचे दोन गट भिडले ; कान, नाकातून रक्त येईपर्यंत मारामारी

कुंभारमाठ येथील घटना ; दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल

मालवण : मालवण येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकांच्या दोन गटात कुंभारमाठ रस्त्यावर राडा झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

मालवण येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी नाश्ता करताना या दोन गटात वाद झाले. त्यांनंतर एक गट आपल्या कारमधून निघाले. यावेळी दुसऱ्या गटाने पुढे गेलेल्या गटाचा कारने पाठलाग केला. त्या कारच्या समोर आपली कार थांबवून एका व्यक्तीला कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या मोटरसायकलचेही नुकसान झाले. तर पर्यटक यांच्या कारचेही नुकसान झाले.

ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती कोल्हापूर येथील पर्यटकांचा कुडाळ तालुक्यातील नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत दोन्ही बाजूने तोंडी स्वरूपात तक्रारी मांडल्या जात होत्या. आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार दोन्ही बाजूच्या तक्रारी घेऊन गुन्हे दाखल केले जातील. असे स्पष्ट केले. उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!