ठरलं ! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आरक्षणासाठी “या” तारखेला निघणार सोडत

राज्यातील २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींसाठी सोडत

मुंबई : राज्यभरातील २१६ नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली आहे.

आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या २१६ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींचा समावेश आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी उद्या (ता. १० जून) नोटीस प्रसिद्ध करतील. १३ जुलै २०२२ रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!