मालवणच्या वीज समस्या “ऑन दि स्पॉट” सुटणार ?

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार महावितरणचे अधीक्षक अभियंता उद्या मालवणात

मालवण : मालवण शहर व परिसरातील वीज ग्राहक व नागरिक यांच्या समस्या अथवा प्रलंबित तक्रारी असल्यास त्या जाणून घेण्यासाठी तसेच ज्या समस्या तात्काळ सोडवणे शक्य आहे, त्या ऑन दि स्पॉट सोडवण्यासाठी अधीक्षक अभियंता कणकवली व अधिकारी टीम बुधवारी ८ जून रोजी सकाळी ११ वाजता मालवण वीज वितरण कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार वीज वितरणच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात येत आहे. तरी ज्या वीज ग्राहक व नागरिकांच्या तक्रारी, समस्या असतील त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका शिवसेना व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!