भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मिडियाप्रमुख पदी दर्शन गोसावी

जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी दिले नियुक्तीपत्र

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द गावातील भाजपचे कार्यकर्ते दर्शन गोसावी यांची भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. भाजप आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी ही निवड जाहीर केली. जिल्ह्यातील भटके-विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरिता व आघाडीचे काम जनतेपर्यंत पोचवण्यासाठी काळे यांनी संघटनात्मक नियुक्तीपत्र देऊन गोसावी यांनी मीडिया प्रमुख पदी निवड केली. गोसावी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!