गोवा, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात देखील डबल इंजिनचं सरकार यावं !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली भावना ; केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या कामाचं केलं कौतुक

मालवण : देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपचं सरकार काम करीत होतं, तेव्हा हे काम कसं चालायचं ते सर्व कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलं आहे. आज महाराष्ट्रा लगत असलेल्या गोवा, कर्नाटक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं डबल इंजिनचं सरकार आहे. पण महाराष्ट्रात नाही, ही खंत आहे. लवकरच महाराष्ट्रातही डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा यावं, अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केली आहे.

अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशन निमित्ताने मालवण दौऱ्यावर आलेल्या गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मालवण भाजप कार्यालय येथे भेट दिली. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांचा भव्य सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप नेते विशाल परब, भाऊ सामंत, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, उद्योजक दीपक परब, विलास हडकर, राजू आंबरेकर, आबा हडकर, जॉन नरोना, अजय शिंदे, दीपक सुर्वे, प्रकाश मेस्त्री, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, दाजी सावजी, भाई मांजरेकर, प्रमोद करलकर, महिला आघाडी शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, पूजा वेरलकर, माधुरी बांदेकर, नमिता गावकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास भारतीय जनता पार्टीमुळे शक्य झाला. जनतेचा पाठिंबा मिळाला पक्षाने नेहमीच विविध जबाबदारी देऊन विश्वास दाखवला. आज दुसरी टर्म मुख्यमंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडत असताना केंद्रात सरकारच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान कामांमुळे अधिक ऊर्जा मिळते. आपल्या सारखी ऊर्जा महाराष्ट्रात मिळावी यासाठी येथेही डबल इंजिन सरकार गरजेचे आहे. अश्या भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केल्या.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कामाचे कौतुक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर चांगले काम सुरू आहे. गोवा राज्यातही त्यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जनहिताचे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!