मालवण पर्यटन महोत्सवाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आज करणार बहारदार गाण्यांचे सादरीकरण

मालवण : मालवण नगरपरिषद व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मालवण दांडी बीच येथे “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवात इंडीयन आयडॉल फेम, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांची खास उपस्थिती असून सायंकाळी ७ वाजता ते बहारदार गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.

पर्यटन महोत्सवा अंतर्गत सायंकाळी ४ ते ५ वाजता मालवणी खाद्य पदार्थ पाककला स्पर्धा, सायंकाळी ६ ते १० ‘आमदार वैभव नाईक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) असे कार्यक्रम होणार आहेत. तर इंडीयन आयडॉल फेम रोहित राऊत हे सायंकाळी ७ वाजता बहारदार गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत.

रोहीत राऊत, प्रसिध्द गायक

१४ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी ७ ते १० मालवण सुंदरी स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण होणार आहे. तर १५ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ लोककलाकार कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७ बक्षीस आणि सांगता समारंभ तर सायंकाळी ७ ते १० यावेळेत “जल्लोष” हा सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या महोत्सवाला पर्यटक व जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून आंनद लुटावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक आणि मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!