टेन्शन वाढलं : सिंधुदुर्गात पुन्हा कोरोनाचा शिरकाव !

मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यात आढळले पॉझिटिव्ह रुग्ण

मालवण : कोरोनामुक्त सिंधुदुर्गात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण मिळून आले असून यातील एक मालवण तर दुसरा वेंगुर्ला तालुक्यात आढळला आहे. मालवण तालुक्यात तळगाव मध्ये एका ५५ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर झाला असताना नव्याने दोन रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५५ हजार ८५० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!