मालवणात काँग्रेसचा जल्लोष ; कोल्हापूरच्या विजयाचा आनंद साजरा

मालवण : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करत विजयी झेंडा फडकवला. या विजयाचा मालवणात काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून जल्लोष साजरा करण्यात आला. मालवण बसस्थानका समोर फटाके फोडून, पेढे वाटत घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी गृहमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व कोल्हापूर मधील पहिल्या महिला नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांच्या फोटोला पेढा भरवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष मेघनाद धुरी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रमोद कांडरकर, युवक जिल्हा सचिव योगेश्वर कुर्ले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश कोयंडे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, मिताली बाबर्डेकर, पराग माणगांवकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!