घुमडे – कातवड येथे २३, २४ एप्रिल रोजी “सरपंच चषक” नाईट क्रिकेट स्पर्धा

बिरमोळे परिवाराच्या वतीने आयोजन ; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, प्रेक्षक- खेळाडूंसाठीही लकी ड्रॉ

कुणाल मांजरेकर

मालवण : बिरमोळे परिवार आणि घुमडे कुटुंबियांच्या वतीने २३ आणि २४ एप्रिल रोजी घुमडे कातवड येथील बिरमोळे मैदानावर बिरमोळे प्रीमिअर लीग “सरपंच चषक” नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत प्रथम विजेत्याला ११ हजार १११ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ११ हजार १११ रुपये आणि चषक दिला जाणार आहे. तर मालिकावीराला आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी साठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये पुरुष गटात प्रथम क्रमांकासाठी कुलर तर द्वितीय क्रमांकासाठी फॅन ठेवण्यात आला आहे. तर महिला गटात प्रथम क्रमांकासाठी पैठणी तर द्वितीय क्रमांकासाठी इस्त्री देण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी प्रथम तीन क्रमांकाना ५००, ३०० आणि २०० रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तरी या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंनी आणि संघ मालकांनी संजय बिरमोळे – 8806109730, अमित बिरमोळे- 7038395272, आबा बिरमोळे- 9158532544, गणेश बिरमोळे – 7888030981 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिरमोळे परिवार आणि घुमडे कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!