ना. नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त १० ते १४ एप्रिल पर्यंत भरगच्च कार्यक्रम

मालवण तालुका भाजपचे आयोजन ; तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण : ज्येष्ठ भाजपा नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने मालवण तालुक्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये चिंदर येथे जिल्हास्तरीय दिंडीनृत्य स्पर्धा, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे रुग्णांना फळ वाटप आणि बेडशीट भेट, मठबुद्रुक येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात फळवाटप, आणि कातकरी समाज वस्तीवर कपडे वाटप, माळगाव येथे नेत्र तपासणी शिबीर आणि अन्य ठिकाणी लोकोपयोगी, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि विकास कामांची भूमिपूजने होणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!