मोठी बातमी : शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला

मुंबई: एसटीच्या विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपले असे वाटत असतानाच आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले.


शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर हल्ला केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच एखाद्या वरिष्ठ नेत्याच्या अशा प्रकारचा हल्ला झाल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. या घटनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त होत्या. मोठ्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलण्यासाठी शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलण्यास तयार असल्याचे प्रतिक्रिया दिली. ल सर्वांनी शांत राहावे. कुणीही दगडफेक आणि चप्पलफेक करू नये. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे, त्यांची सुरक्षा माझ्यासाठी महत्वाची आहे. मी सर्वांचे म्हणणे ऐकायला तयार आहे फक्त त्यांनी शांत रहावे, असे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर पोलिसांनी शेकडो कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!