वायरी भूतनाथ येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वायरी भूतनाथ विभागाचे आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वायरी भूतनाथ विभाग आणि माधवबाग कणकवली यांच्या वतीने वायरी भूतनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भगवान लुडबे, माजी सरपंच साक्षी लुडबे, ग्रामसेवक सुनील चव्हाण, माजी उपसरपंच संदेश तळगावकर, श्याम झाड, विक्रम लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, प्रदीप मयेकर, महादेव मालवणकर, मिलींद झाड, प्रवीण लुडबे, ग्रा प सदस्य मुन्ना झाड, गोट्या मसुरकर, यांच्यासह माधवबाग कणकवलीच्या डॉ. पल्लवी पाटील, वैभव पालकर, स्वरा चिंदरकर, वासुदेव गावकर आदी उपस्थित होते. या शिबिरात ह्रदयरोग, सांधेदुखी, वात, विकार, मूळव्याध, ब्लड प्रेशर, डायबेटीस, स्ट्रेस, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, संधिवात, आमवात, अपचन आदी आजारांची तपासणी केली जात आहे.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भालचंद्र केळुसकर यांनी या शिबिराच्या आयोजनाचे कौतुक केले. सध्या हृदयरोगाचे प्रमाण चिंताजनक असून हृदयरोगाची वेळीच चिकित्सा करणे आवश्यक असते. माधवबागच्या मार्फत दर्जेदार आरोग्य सेवा दिली जात असून त्यांच्या मार्फत होणाऱ्या तपासणीचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणे मोठी चूक आहे. कोरोनात तपासणीसाठी झालेल्या वेळेत दिरंगाई झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी ग्रामसेवक सुनील चव्हाण यांनीही विचार मांडले.