एक दिवस ह्याची पण चरबी उतरल्या शिवाय राहणार नाही !
भाजपा नेते निलेश राणेंचा गर्भित इशारा
कुणाल मांजरेकर
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात राग आळवला जात आहे. युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही महाविकास आघाडीची भाजपला भीती वाटायला लागल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना ट्विटरवरून फटकारले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा फोटो शेअर करीत निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “हा रोज एकच बोलतोय, याची टेप अडकली आहे. याची पण चरबी एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही. आजोबांमुळे मंत्री झालास, आमदार झालास नाहीतर कुठल्यातरी पार्टीमध्ये दुसऱ्याची फुकट दारू पिऊन पडलेला असता. कर्तुत्व शून्य माणूस अंगठा तोंडात घेऊन कसा मंत्री होतो याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.