प्रख्यात आर्किटेक्चर अरुण बादेकर यांचे निधन
मालवण : शहरातील रेवतळे येथील रहिवासी तथा प्रख्यात आर्किटेक्चर अरुण काशिनाथ बादेकर (वय ८३) यांचे रविवारी ६ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी चेन्नई येथे बरीच वर्षे आर्किटेक्चर म्हणून काम केले होते.
इंटिरिअर डिझाईन मधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल चेन्नई मधील महाराष्ट्र असोसिएशनने त्यांना २०१२ मध्ये ग्रेट मराठा अँवार्ड देऊन गौरविले होते. लायन्स क्लब चेन्नईचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी दक्षिणात्य नाटकांबरोबरच चित्रपटातही काम केले आहे. तसेच कमलहसन यांच्या “हे राम” या चित्रपटातही सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका त्यांनी साकारली आहे. ते महाराष्ट्र मंडळ चेन्नईचे अध्यक्ष होते. सध्या मालवण लायन्स क्लबचे ते सदस्य होते. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर नुतनीकरणाचे डिझाईनही त्यांनी बनविले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे, भाचे असा परिवार आहे. त्यांच्या वर रविवारी रात्री उशिरा रेवतळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अमेय बादेकर यांचे ते काका होत.