मालवणात १२, १३ मार्च रोजी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजन

मालवण : मालवण स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने कै. लीलाधर हडकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त १२ आणि १३ मार्च या दोन दिवशी ११, १३, १५ आणि १७ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मालवण टेबलटेनिस अकॅडमी, रेवतळे मालवण येथे होणार आहे, अशी माहिती मालवण स्पोर्टस असोसिएशनकडून आली आहे.

गट क्र. १ मुलगे –  ११ वर्षाखालील मुलगे, १३ वर्षांखालील मुलगे, १५ वर्षांखालील मुलगे आणि १७ वर्षांखालील मुलगे. गट क्र. २ – ११ वर्षाखालील मुली, १३ वर्षाखालील मुली, १५ वर्षाखालील मुली आणि १७ वर्षाखालील मुली या प्रमाणे १२ व १३ मार्च २०२२ रोजी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशासाठी ११ मार्च अंतिम तारीख असून स्पर्धेची वेळ, प्रवेश आणि इतर माहितीसाठी विष्णु कोरगावकर, ८०८०२४८२०२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!