किसान मोर्चाच्या विधानभवनावरील मोर्चात सिंधुदुर्गातील १०० हून अधिक शेतकरी सहभागी
महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात मोर्चा
मालवण : भाजपा किसान मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये सिंधुदुर्गातील १०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
भाजप प्रदेश कार्यालय मुंबई ते विधान भवन पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव (नाना) काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला सामोरे न जाता राज्य सरकारने विधानसभा अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित केले. या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील कुडाळ, किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग , जिल्हा चिटणीस अजय सावंत सावंतवाडी आणि जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.