बंदर निरीक्षकांनी दाखवली माणुसकी ; अत्यवस्थ स्थितीतील गाईवर उपचार

अमोल ताम्हणकर यांच्यासह बंदर विभागातील कर्मचाऱ्यांचं होतंय कौतुक

मालवण : मालवण बंदर निरीक्षक कार्यालयाच्या आवारात अत्यवस्थ स्थितीत पडलेल्या मोकाट गाईवर बंदरनिरीक्षक अमोल ताम्हणकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार केले. बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या माणूसकीचे कौतुक होत आहे.

मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न नेहमी नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना भेडसावत आहार. मात्र नगरपालिका प्रशासन झोपी गेल्याने मोकाट गुरांवर कारवाई होताना दिसत नाही. वास्तविक मोकाट जनावरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असताना पालिका कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असाच एक प्रसंग शनिवारी मालवण बंदर कार्यालयानजीक घडला. कार्यालयाच्या आवारात एक गाय प्रकृती बिघडल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत पडली होती. यावेळी मालवण बंदर कार्यालयाचे बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, भाऊ नार्वेकर, साहेबराव कदम यांनी त्या गाईला पाणी पाजले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांना बोलावून उपचार केले. शिवाय ती गाय रणरणत्या उन्हात पडल्याने तिच्या सावलीसाठी तात्पुरती शेडही उभारली. बंदर निरीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने पहावयास मिळाले. संबंधित मालकाने त्या मोकाट जनावराची ओळख पटवून तिला घरी घेऊन जावे, असे आवाहन अमोल ताम्हणकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!