मालवण मधील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
एमएसपीएम मेडीकल कॉलेज आणि गणेश कुशे, ममता वराडकर यांचे आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : एमएसपीएम मेडीकल कॉलेज पडवे – सिंधुदुर्ग आणि माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा ९० जणांनी लाभ घेतला.
ग्रामीण रुग्णालय नजीक विद्याधर निवास येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, अस्थीरोग तपासणी, आहारतज्ञ सल्ला आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या शिबिरात ९० जणांनी तपासणी केली. यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका ममता वराडकर, एमएसपीएम मेडीकल कॉलेजचे अरविंद कुडतरकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, राजेश कुशे, निकीत वराडकर, विजय केनवडेकर, गार्गी कुशे, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर , मोहन वराडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी शिबिराला भेट दिली.