कोळंब येथे स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरचा शुभारंभ
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
कुणाल मांजरेकर
मालवण : कोळंब भटवाडी येथील हडकर स्टॉप येथे स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरचा खुले झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते फित कापून या सेंटरचे उदघाटन करण्यात आले आहे. माधुरी मेस्त्री- नेमळेकर यांनी हे केंद्र सुरू केले आहे.
या उद्घाटन प्रसंगी कोळंब तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय नेमळेकर, माजी सभापती उदय परब, आरोग्य विभागाचे श्री. कोरडे, संदीप भोजने, बाबा नेमळेकर, निखिल नेमळेकर, शेखर गाड, दिलीप नेमळेकर, उत्तम मांजरेकर, सौ. साक्षी मांजरेकर, सौ. मेघा मेस्त्री, अजय जोशी, बापू गावकर, गणेश हडकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर मध्ये रक्त, लघवी, थुंकी या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना जवळच्या भागात दर्जेदार सोय उपलब्ध व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना शहरात जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी घरी जाऊन त्यांचे नमुने घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे संचालिका सौ. माधुरी मेस्त्री – नेमळेकर यांनी सांगितले.
झांट्ये हॉस्पिटलच्या प्रख्यात स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांट्ये, कोळंब उपकेंद्राचे डॉ. प्रशांत पवार, डॉ. सौ. शुभांगी जोशी, डॉ. विद्याधर अमरे यांनी स्वामी समर्थ ब्लड कलेक्शन सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.