नारायण राणेंच्या अटकेचे सिंधुदुर्गात पडसाद ; भाजप कार्यकर्ते आक्रमक
कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, बांदा येथे भाजपचे आंदोलन
सिंधुदुर्ग : केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर सिंधुदुर्गात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, बांदा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. ‘नारायण राणे अंगारे बाकी सब भंगार है’ या घोषणांनी मंगळवारी जिल्हा दुमदुमून गेला. ठाकरे सरकारने सत्तेचा गैरवापर करून राणेसाहेबाना अटक केली आहे. .जर त्यांच्यावर अशी कारवाई करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वाईट बोलले आहेत. त्यांच्यावरही सुद्धा गुन्हा दाखल करा. अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
कणकवली येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, रणजित देसाई, राजू राऊळ, संध्या तेरसे, राजश्री धुमाळे, दिपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या तवटे, मेघा गांगण, प्रज्ञा ढवण, श्रिया सावंत, सुप्रिया नलावडे, कविता राणे, साक्षी सावंत, प्राची कर्पे, प्रकाश सावंत, अण्णा कोदे, परशुराम झगडे, राजा धुरी, बाबू गायकवाड, महेश सावंत, नरेंद्र गावकर, संजय ठाकूर, निकील आचरेकर, विराज भोसले, शिशिर परूळेकर, आनंद घाडीगांवकर, निखिल आचरेकर, स्वाती राणे, साक्षी सावंत, रेखा काणेकर, हर्षदा वाळके, संजना हळदीवे, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, सुमेधा पाताडे, राजू पेडणेकर, बाळा गावडे, समर्थ राणे आदी उपस्थित होते.
सावंतवाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक होत येथील कार्यालयासमोर तीव्र निषेध व्यक्त केला. आज केवळ रस्त्यावर उतरलो आहोत पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल जर अंगावर आला तर शिंगावर घेऊ असा इशारा यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी दिला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नारायण राणे यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर मंडल अध्यक्षा मोहिनी मडगावकर, न.प. सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, संतोष गांवस, दिलीप भालेकर, विनोद सावंत, केतन आजगांवकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या विरोधात कुडाळ भाजप कार्यालय येथे देखील घोषणाबाजी केली ‘नारायण राणे अंगारे बाकी सब भंगार है’ या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जन आशीर्वाद यात्रेत कुठेतरी खंड पाडावा या उद्देशाने हे सगळ षडयंत्र रचले गेल्याचा आरोप यावेळी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोवण्याचे हे षड्यंत्र आहे . जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे अशा प्रकारची षड्यंत्र रचून जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे यांनी अशा प्रकारच्या धमक्यांना भाजपचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत. जन आशीर्वाद यात्रा ही होणारच आहे असे सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा निमंत्रक राजू राऊळ, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर, महिला ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, ममता धुरी, राकेश कांदे, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, पप्प्या तवटे, रूपेश कानडे, रुपेश बिडये, अजय आकेरकर, राजेश पडते, मोहन सावंत, विनायक अणावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
भाजप नेते केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या अटकेनंतर बांद्यातील भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. राज्य सरकारच्या बेकायदा अटक कारवाई विरोधात बांद्यातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावर ठाण मांडले. राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, पं. स. उपसभापती शीतल राऊळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य मंदार कल्याणकर, ज्ञानेश्वर सावंत, प्रविण देसाई, मधुकर देसाई, दादू कविटकर, उमेश पेडणेकर, साई सावंत, दीपक सावंत, बाळू सावंत मोर्ये, अवंती पंडीत, साई धारगळकर, अक्षय परब, शुभम साळगावकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.