लयभारी ! वैभव नाईकांकडून तब्बल २५ किमी सायकल रायडींग

निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत केले अंतर पार

इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ सायकल मॅरेथॉनमध्ये घेतला होता सहभाग

कणकवली : येथील कनक रायडर्स सायकल क्लबच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा सायकल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आज इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२२ या सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये २५ किलोमीटर गटात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सहभाग घेतला होता. आ. वैभव नाईक यांनी कणकवली ते कनेडी असा २५ किलोमीटर परतीचा प्रवास निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पूर्ण केला.


याबद्दल आयोजकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन आ. वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला
.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!