दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग अध्यक्षपदी विजय केनवडेकर

मालवण : दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग अध्यक्षपदी विजय केनवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा यांनी ही निवड जाहीर केली आहे.

अनुसूचित जाती उद्योजकांसाठी काम करणाऱ्या दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी) संस्थेची सभा संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार भवन कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी पद्मश्री रविकुमार नारा यांनी विजय केनवडेकर यांची कोकण विभाग अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक धोरणानुसार डीकी ही संस्था देशभरात काम करत असून अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी हा चेंबर काम करीत आहे. देशाचा आर्थिक विकास सर्वसामान्य नागरिकांकडून झाला पाहिजे. सर्व स्तरातील उद्योजकांचा आर्थिक उद्धार झाला पाहिजे, या विचाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना अनुसूचित जमातीसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य उद्योजकाला मिळण्यासाठी डीकी ही संस्था काम करत आहे. यात कोकणवासीय उद्योजकांना सहभागी करून घेण्यासाठी कोकणाची जबाबदारी विजय केनवडेकर यांच्याकडे अध्यक्षपद देऊन सोपवण्यात आली आहे. तसेच लघु सुक्ष्म मध्यम उद्योगांमध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभा करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली आहे, याची माहिती व प्रसारण करण्यासाठी उद्योजकांना लाभ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. अनुसूचित जातीतील उद्योजकांसाठी देशभरात उद्योगधंद्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. यांचा उद्योगात चिकाटी ठेवून काम केल्यास हे यश आपण खेचून आणू शकतो तसेच अनुसूचित जाती मधील उद्योजकाने उत्पादित केलेला माल सरकार दरबारी कसा विक्री केला पाहिजे व त्याचा लाभ कसा घेतला पाहिजे याचे मार्गदर्शन पद्मश्री रविकुमार नारा यांनी केले.

उद्योग आधार व उद्योजकांसाठी व्यवसायासाठी बँकेकडून मिळणारे क्रेडिट कार्ड कसे उपयोगात आणले पाहिजे, याची माहिती संतोष कांबळे यांनी दिली. यावेळी अमोल गवळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजक हर्षवर्धन बोरवडेकर, अजिंक्य पाताडे, अभिजीत भोसले, विराज भोसले, दिपक पिंगुळकर, गुरुप्रसाद चव्हाण, नंदन वेंगुर्लेकर, अमित चव्हाण, अजित धामापुरकर, विशाल जाधव, विरेश पवार, सौ. मालवणकर व अनुसूचित जातीतील उद्योजक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!