पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते “आरमार” चे लोकार्पण

देशातील पहिली स्कुबा डायव्हिंगची अत्याधुनिक बोट आता सिंधुदुर्गात

तारकर्ली येथे कार्यक्रम ; बोटीचे स्टेअरिंग ना. आदित्य ठाकरे यांच्या हाती

सिंधुदुर्गच्या समुद्रात नजीकच्या काळात “नाईट डायव्हिंग” सुरू होणार

कुणाल मांजरेकर

मालवण : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉंडेचेरी वरून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या “आरमार” नावाच्या बोटीचे उद्घाटन पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या ताफ्यात ही अत्याधुनिक बोट दाखल झाली आहे. यावेळी ना. आदित्य ठाकरे यांनी बोटीचे स्टेअरिंग हाती घेत बोट चालविण्याचा आनंद घेतला. 

या बोटीत चेंजिंग रूम, अत्याधुनिक स्वच्छतागृह अत्याधुनिक सोयी सुविधा  आहेत. त्यामुळे भविष्यात बोटीच्या माध्यमातून रात्री सुद्धा स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन जिल्ह्यात पर्यटनाचे आणखी एक दालन खुले झाले आहे. दरम्यान, बोटीचे उद्घाटन केल्यानंतर तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला ना. आदित्य ठाकरे यांनी भेट देत  उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे व सामग्रीची, तसेच स्कुबा डायव्हिंग टॅंकची पाहणी केली. एमटीडीसीच्या इमारतीवरून समुद्र किनारपट्टी व एमटीडीसी परिसराची पाहणी केली. याप्रसंगी तारकर्ली, देवबाग, मालवण येथील  पर्यटन व्यवसायिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने दिली. वायरी जि. प. शाळा येथे ना. आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मालवणच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देण्याची मागणी यावेळी आ. वैभव नाईक यांनी ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे  केली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार दीपक केसरकर यांच्यासह शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, जलपर्यटन विभागाचे दिनेश कांबळे, साहसी पर्यटन क्षेत्राचे रोहित आयरे, एमटीडीसीचे डॉ. सारंग कुलकर्णी, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बबन शिंदे, हरी खोबरेकर, अमित पेडणेकर, सुशांत नाईक, महेश कांदळगावकर, नितीन वाळके, मंदार केणी, बबन बोभाटे, मंदार शिरसाट, यतीन खोत, रुपेश पावसकर, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर आदींसह  शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे  पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!