वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख लवकरच सिंधुदुर्गात

अरविंद मोंडकर यांची माहिती ; वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी बाबत मानले आभार

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी केलेल्या पाठपुराव्या बद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आभार युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत.

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन येथे २०१९ च्या विधानसभा उमेदवारांची आढावा बैठक आयोजित केली होती. या आढावा बैठकीत कुडाळ विधानसभा मतदारसंघात ओरोस येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अरविंद मोंडकर यांनी ना. देशमुख यांचे आभार मानले. आपण लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितल्याची माहिती श्री. मोंडकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!