… तर सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा रोखणार : शिवसेनेचा इशारा

नारायण राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी आंदोलने

मालवण (प्रतिनिधी )नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे.  नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निदर्शने करण्यात येत आहेत.


       कुडाळ ,मालवण,कणकवली देवगड, आचरा, इत्यादी ठिकाणी  नारायण राणेंचा प्रतिकात्मक पुतळा करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.नारायण राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक न झाल्यास सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा रोखणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. यावेळी “निम का पत्ता कडवा है नारायण राणे भडवा है!” “गली गली मै शोर है नारायण राणे चोर है! “कोंबडी चोर कोंबडी चोर” शिवसेना जिंदाबाद! अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र नारायण राणेंच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत.शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!