संजय राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेनंतर आता भाजपाकडून “नारायणास्त्र” धडाडणार
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्या (बुधवारी) मुंबईत पत्रकार परिषद
कुणाल मांजरेकर
शिवसेना नेते संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी मुंबईत पार पडली. संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजप कडून उद्या मुंबईत नारायणास्त्र धडाडणार आहे. उद्या (बुधवारी) सायंकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे नरीमन पॉईंट येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप, ईडी सह खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे उद्या बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता भाजप प्रदेश पक्ष कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे उद्या नारायण राणे काय बोलतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.