सिंहाच्या गुहेत यायचं धाडस करू नका ; नितेश राणेंनी भरला दम !
सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने- सामने आले आहेत. राणेंच्या जुहू मधील बंगल्या समोर शिवसैनिक जमण्याची शक्यता असल्याने या शिवसैनिकांना राणेंचे कनिष्ठ सुपूत्र, आमदार नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. चुकूनही सिंहाच्या गुहेत यायचं धाडस करू नका, असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे.
नारायण राणे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. काही शिवसैनिक राणेंच्या जुहू मधील बंगल्या समोर आंदोलन करणार असल्याच्या वृत्तानंतर आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करून शिवसेनेला इशारा दिला आहे. युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आले आहे.
एकतर मुंबई पोलीसांनी त्यांना तिथे येण्यापासून रोखावे किंवा तिथे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही !!सिंहाच्या गुहेत जाण्याचे धाडस करू नका !, आम्ही वाट पाहू ! असं नितेश राणेनी म्हटलं आहे.