आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होणार ?
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. ओरोस जिल्हा न्यायालय परिसरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल वाढल्याने याला दुजोरा मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना त्यांना दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात हजर होऊन अटक आणि जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कालपासूनच सिंधुदुर्गात हजर झाले असून आज सकाळपासून राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर हालचाली वाढल्या आहेत. त्यातच जिल्हा न्यायालय परिसरात भाजपा कार्यकर्ते जमू लागल्याने आमदार राणे आजच जिल्हा न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.