राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह !
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे.