कणकवलीत अग्नितांडव …

मध्यरात्री घडली दुर्घटना ; सुदैवाने स्टॉल बचावले, हॉटेलचे मात्र नुकसान

कणकवली: कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरडवे रोड येथे साबिया गॅरेजला भीषण आग लागली. या आगीची झळ बाजुला असलेल्या हॉटेल सदगुरुलाही बसली. घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना मध्यरात्री १ वा. सुमारास घडली आहे.

दरम्यान सविस्तर माहीती अशी की, साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने कोणी शेकोटी सदृश्य पेटवली असावी. त्याचीच झळ लागून सदर आग साबिया गॅरेजला लागली असावी असा अंदाज उपस्थितांकडून वर्तवण्यात येत असून यावेळी त्या गॅरेजमधे ज्वलनशील ऑईलसह इतर सामानासह क्रैब मधील गाड्या आदी भीषण आगीत जळून खाक झाले. त्यानंतर लगतच असलेल्या हॉटेल सदगुरूला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील सामान बाहेर काढले. तर बाजुलाच एका लाईन मधे अन्य २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तर आगीची माहीती मिळताच कणकवली अग्निशमक दलाचा बंब दाखल झाला व आग विझवण्यास सुरवात केली. यावेळी सुशिल तांबे, वैभव आरोलकर, श्री. फर्नांडीस, ओमकार वाळवे, न. पं. कर्माचरी श्री. जाधव, श्री. मोर्य, गणेश लाड उपस्थित होते. तर पोलीस नाईक पी.एस. पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर आगीत बॅटरी, गॅरेजचे साहित्य, दोन ऑइलचे बॅरल असे आदी साहित्य मिळून एक लाखाचे नुकसान झाल्याचे गॅरेज मालक अस्लम शेख व शारूख शेख (रा.बोर्डवे ) यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!